
नागपूर: सी पी अँड बेरार एज्युकेशन सोसायटीच्या प्रहार मिलिटरी स्कूल, रवीनगर, नागपूरच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे भव्य आयोजन रेशीमबाग मैदान येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत विविध वयोगटातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये कब क्लास, कॅडेट क्लास आणि सब ज्युनियर या वयोगटातील अनेक बॉक्सिंगपटूंनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवत स्पर्धेची रंगत वाढवली. रोमांचक सामन्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. विजेत्यांना आकर्षक पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.
या प्रसंगी प्रहार मिलिटरी स्कूल, रवीनगरच्या संचालक व्यवस्थापन मंडळाचे मान्यवर भालचंद्र कागभट उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांचे विशेष योगदान राहिले. त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत अशा स्पर्धा युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरतात, असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे बेटीया शक्ती फाउंडेशन, नागपूर अध्यक्ष श्रीधर आडे, माजी सैनिक प्रभाकर आकोटकर, माजी सैनिक राजेश आलोने, माजी सैनिक योगेश सालवे, माजी सैनिक मुन्नालाल कनोजिया, राहुल पानट, आशिष रोटीवार उपस्थित होते. तसेच श्री गणेश पुरोहित बॉक्सिंग कोच तसेच लवंशू खारडकर प्रहार मिलिटरी स्कूलचे बॉक्सिंग प्रशिक्षक उपस्थित होते.
गणेश पुरोहित बॉक्सिंग प्रशिक्षक महाराष्ट्रातील पहिले एनआयएस बॉक्सिंग प्रशिक्षक असून त्यांचा प्रशिक्षण अनुभव दांडगा आहे. १९९० ते २०२२ महाराष्ट्र वरिष्ठ संघाचे निवड समिती सदस्य आणि मुख्य प्रशिक्षक २०० हून अधिक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस सेवेत निवडले. ५० हून अधिक विद्यार्थी संरक्षण सेवेत आहेत. ३० हून अधिक विद्यार्थी रेल्वे सेवेत आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू अल्फिया पठाण यांचे प्रशिक्षक आशियाई सुवर्णपदक विजेते व इतर अनेक गौरव प्राप्त केले आहेत. अशा या बहु आयामी असणाऱ्या गणेश पुरोहित यांनी प्रहार मिलिटरी स्कूल रवीनगरचे लवांशू खारडकर यांना प्रशिक्षित केले आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि आयोजकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. भविष्यात नागपूरमधील युवा खेळाडूंना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.