
मुंबई संघ उपविजेता, विदर्भ संघ तृतीय
नाशिक ः मथुरा येथे झालेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. मुंबई संघाने उपविजेतेपद संपादन केले. विदर्भ संघाने तिसरा क्रमांक मिळवला.
भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व टेनिस क्रिकेट असोसिएशन उत्तर प्रदेश
यांच्या संयुक्त विद्यमाने सहावी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मधुरा येथे नुकतीच पार पडली. या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ, मध्य प्रदेश व बिहार राज्यांच्या संघांनी सहभाग घेतला होता. राजस्थान तेलंगणा, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांचे संघ सहभागी झाले होते. १४ वर्षांखालील स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांक मुंबई, तिसरा क्रमांक विदर्भ संघाने तर चौथा क्रमांक बिहार संघाने संपादन केला.
या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी इंडिया टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर, भारतीय टेनिस क्रिकेट महासंघ आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव मीनाक्षी गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंडिया टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल माहिती व त्याचे महत्त्व सांगितले. या स्पर्धेसाठी भारतातून मुलांचे ११ संघ व मुलींचे ७ संघ सहभागी झाले होते.

१४ वर्षांखालील गटात महाराष्ट्र संघाने बिहार व मुंबईने विदर्भ संघावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत महाराष्ट्र संघाने आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाद्वारे मुंबई संघावर एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. १४ वर्षांखालील गटात विदर्भ संघाने तिसरा तर बिहार संघाने चौथा क्रमांक मिळवला.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा अखिल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या सचिव मीनाक्षी गिरी यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय अध्यक्ष कन्हैया गुजर व बिहार राज्याचे सचिव रणजित राज यांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक महेश मिश्रा, अविनाश धनगर, अक्षय आरडे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत पंच म्हणून सोमा बिरादार, दर्शन थोरात, मानस पाटील, ऋतुजा तोरडमलकर, ऋतुजा सकटे, रिंकू दीक्षित यांनी काम पाहिले.