
जळगाव ः रावेर येथील श्री व्ही एस नाईक महाविद्यालयाच्या तुषार सूर्यवंशी याने गोंडवाना येथे झालेल्या अश्वमेध आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण व एक कांस्य अशी दोन पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.
चंद्रपूर येथील गोंडवाना विद्यापीठात ही स्पर्धा झाली. अश्वमेध आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या संघात श्री व्ही एस नाईक महाविद्यालयाच्या तुषार सूर्यवंशी याने ८०० मीटर धावण्याच्या प्रकारात १.५२ वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तसेच ४ बाय ४०० रिले या प्रकारात कांस्य पदक मिळवले.
संस्थेचे अध्यक्ष हेमंतभाऊ नाईक, संस्थेचे डॉ प्रतीक नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ दिनेश पाटील, उपप्राचार्य व क्रीडा समन्वयक प्रा एस यु पाटील, उपप्राचार्य प्रा संदीप धापसे, डॉ पी व्ही दलाल, डॉ एस आर चौधरी, डॉ ए एन सोनार, डॉ एस जी चिंचोळे, डॉ व्ही बी सूर्यवंशी, प्रा व्ही डी पाटील, डॉ एल सी नेमाडे, क्रीडा समिती सदस्य प्रा चतुर गाडे, प्रा नरेद्र घुले, डॉ बी जी मुख्यदल, प्रा सत्यशील धनले, डॉ संतोष गव्हाड, डॉ नीता जाधव, डॉ स्वाती राजकुंदन, प्रा सागर महाजन, प्रा वळवी, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ उमेश पाटील, ऑफिस व्यवस्थापक युवराज बिरपन आदींनी तुषार सूर्यवंशीचे अभिनंदन केले.