पॅसिफिक स्पोर्ट्स फेडरेशनच्या महाराष्ट्र सचिवपदी गणेश पेरे

  • By admin
  • February 27, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

खजिनदारपदी नांदेडचे विनोद दाढे

बुलढाणा ः भारतीय पॅसिफिक स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक व आंतरराष्ट्रीय मिंक्स बॉक्सिंगचे पंच गणेश पेरे यांची महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी निवड करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक व तायक्वांदो प्रशिक्षक विनोद दाढे यांची महाराष्ट्र राज्याच्या खजिनदारपदी निवड झाली आहे. भारतीय पॅसिफिक स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अशोक कुमार व जनरल सेक्रेटरी विमल कुमार यांच्या हस्ते गणेश पेरे व विनोद दाढे यांची निवड करण्यात आली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *