
जळगाव ः विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा २०२५ चा निकाल २२ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत केसीई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रणव श्रीकृष्ण बेलोरकर यांनी शारीरिक शिक्षणशास्त्र विषयात १८० गुणांसह यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. प्रणव बेलोरकर यांच्या या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ अशोक राणे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.