ग्रेस गुणांचा फॉर्म भरताना आपले सरकार अॅपमध्ये अनेक त्रुटी

  • By admin
  • February 27, 2025
  • 0
  • 209 Views
Spread the love

अनावश्यक गोष्टी वगळण्याची राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांची मागणी

पुणे ः महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रेस गुणासाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून पात्र शालेय खेळाडूंसाठी आपले सरकार ऑनलाईन पोर्टलद्वारे माहिती भरण्याचे अनिवार्य केलेले आहे. माहिती ऑनलाईन भरण्याबाबत अनेक
अडचणी येत आहेत. गुणांसाठी पात्र खेळाडूंची सर्व माहिती सर्व जिल्हा, विभाग, आणि राज्यस्तरीय क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. मागील वर्षापर्यंत सदर माहिती भरण्यामध्ये शाळांना फारसा त्रास झालेला नव्हता. परंतु या वर्षी संबंधीत पोर्टलवर भरावयाच्या माहितीमध्ये अनावश्यक माहितीसह अनेक त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. या सर्व त्रुटींची पुर्तता करुन व अनावश्यक बाबी वगळून शालेय खेळाडुंची माहिती भरण्यासाठी संबंधीत सर्व फाॅर्ममध्ये सुधारना करुन सुधारीत माहिती प्रशिक्षणाचे आयोजन करण्या बाबत संबंधीत सर्वच कार्यालयांना आदेश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने क्रीडा आयुक्त यांना दिले आहे.

आपले सरकार अॅपमध्ये इयत्ता सहावी ते दहावीचे सर्टिफिकेट अपलोड करताना चालू वर्षाचे सर्टिफिकेट अपलोड करण्याची सुविधा नाही, अकरावीत गुणास पात्र खेळाडूचे सर्टिफिकेट अपलोड करता येते. परंतु तो बारावीत खेळल्याचा पुरावा अपलोड करण्याची सुविधा नाही, ऑनलाईन फाॅर्म रिजेक्ट होऊ नये यासाठी क्रीडा विभागाकडून प्रशिक्षण झालेले नाही. प्रशिक्षण न झाल्याने फाॅर्म रिजेक्टची जबाबदारी शिक्षकांवर टाकणे योग्य नाही, क्रीडा स्पर्धेची सर्व अद्यावत माहिती व त्याचे रेकाॅर्ड क्रीडा विभागाकडे असताना सदर माहिती पुन्हा विचारली जाते आणि काही माहिती अनावश्यक भरावी लागते अशी सर्व माहिती फाॅर्म मधून वगळावी, खेळाडूंची पिन कोड, मोबाईल नंबर, पत्ता लिंग, जात अशा सर्व अनावश्यक बाबी फाॅर्म मधून वगळण्यात याव्यात, फाॅर्म मधील क्लिष्ट प्रश्नांची ऑनलाईन माहिती भरताना न कळत झालेल्या तांत्रिक चुकीमुळे फाॅर्म रद्द होऊ नये व यासाठी शिक्षकांना जबाबदार धरु नये, फाॅर्म मध्ये झालेली चुक दुरुस्तीसाठी फाॅर्म मध्येच तरतुद असावी, सन २०१९ च्या ग्रेस गुण संदर्भातील शासन आदेशाची पूर्तता आवश्यक असताना सन २०१५च्या आदेशाचा उल्लेख झालेला आहे. दुरुस्ती व्हावी, सर्वसाधारण सूचना मधील क्रमांक ३ चा मुद्दा २०१५ की २०१९ चा जीआर लक्षात घ्यावा हे कृपया स्पष्ट करावे असे अनेक क्लिष्ट मुद्दे अडचणीचे ठरत आहेत. या सर्व त्रुटींचा विचार करून ग्रेस गुण संदर्भातील मागवल्या जाणार्‍या ऑन लाईन फाॅर्म मध्ये सुधारणा व्हावी अशी मागणी राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांनी केली आहे.

तसेच ग्रेस गुणांचे फॉर्म भरताना शाळांवर तिहेरी खर्चाचा भार पडणार आहे. आपले सरकार पोर्टलसाठी २४.३३ पैसे, बोर्डाचे २५ रुपये आणि ई-सुविधा केंद्राचे शुल्क, ग्रामीण आदिवासी भागातील व मराठी माध्यमांच्या शाळांना ही रक्कम भरणे त्रासदायक जाणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे बोर्डाकडून आकारली जाणारी २५ रुपये फी माफ व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने या निवेदनाद्वारे केली आहे.

कोट

महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रेस गुणांसाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून पात्र शालेय खेळाडूंसाठी आपले सरकार पोर्टलद्वारे माहिती भरणे अनिवार्य केले आहे. सदर माहिती भरण्याबाबत अनेक अडचणी येत आहेत. तसेच गुणासाठी पात्र खेळाडूंची सर्व माहिती जिल्हा, विभाग, राज्यस्तर त्या त्या क्रीडा कार्यालयात उपलब्ध आहे. फॉर्म मधील क्लिष्ट प्रश्नांची ऑनलाइन माहिती भरताना नकळत झालेल्या तांत्रिक चुकीमुळे फॉर्म रद्द होऊ नये व यासाठी शिक्षकांना जबाबदार धरू नये फॉर्म मध्ये झालेली चूक दुरुस्तीसाठी फॉर्ममध्येच तरतूद असावी.

  • प्रा राकेश खैरनार, मराठवाडा विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ.

कोट

खेळाडूंची माहिती भरताना जाणवलेल्या त्रुटी व अनावश्यक बाबींमध्ये इयत्ता सहावी ते दहावीचे सर्टिफिकेट अपलोड करताना चालू वर्षाचे सर्टिफिकेट अपलोड करण्याची सुविधा नाही. तसेच अकरावीत गुणांसाठी पात्र खेळाडूंचे सर्टिफिकेट अपलोड करता येते. परंतु, तो बारावीत खेळण्याचा पुरावा अपलोड करण्याची सुविधा नाही. सन २०१९च्या ग्रेस गुण संदर्भातील शासन आदेशाची पूर्तता आवश्यक असताना सन २०१५ च्या आदेशाचा उल्लेख झालेला आहे यात दुरुस्ती व्हावी.

  • डी आर खैरनार, अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *