
मुंबई : सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत सायरस आगा आणि चेतन मुलानी यांनी आपापल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आपल्या प्रवासाला जोरदार सुरुवात केली.
सीसीआयच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत सायरस आगा आणि आशीष गोरे यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा ठरला. २-२ अशा बरोबरीनंतर आगा याने निर्णायक पाचवी फ्रेम ६५-२१ अशी जिंकून सामन्यात ३-२ असा विजय मिळवला. यासोबतच आगा दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
चेतन मुलानी याने सुरेख फॉर्ममध्ये खेळताना विजय लिलवाचा ३-० (६०-१७, ४५-५ आणि ६३-२८) असा सहज पराभव केला आणि आपल्या उत्कृष्ट खेळाने स्पर्धेतील आपला ध्यास कायम ठेवला. दरम्यान, सीसीआयचे बिलियर्ड्स मार्कर संतोष आबनावे यानेही पहिल्या फेरीत लविन लेखराजवर ३-१ (७२-३०, ६७-२३, ३९-५६ आणि ५९-५४) विजय मिळवला.