
छत्रपती संभाजीनगर ः इंडियन कॅडेट फोर्स व श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ फेब्रुवारी रोजी मराठवाडा दुर्गभरारी मोहिम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जाणून घेऊ या आपल्या मराठवाड्यातील किल्ल्यांचा वारसा…आजच्या तरुण पिढीला महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील इतिहासाची व शूरवीरांची व गड किल्ल्यांची माहिती व्हावी, आपला इतिहास जिवंत राहावा यासाठी २८ फेब्रुवारी रोजी श्री सरस्वती भुवन प्रशाला जालान सभागृह, औरंगपुरा येथे या संदर्भात प्रदर्शन कमांडर विनोद नरवडे व जगदीश खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी दहा वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ उल्हास शिऊरकर, मेजर निशांत जोशी, सुधीर जहागिरदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौतम पातारे, डॉ जीवन राजपूत, मुख्याध्यापक विश्वरुप निकुंभ, शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉ सविता मुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती कमांडर विनोद नरवडे, जगदीश खैरनार यांनी दिली.