
सोलापूर जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
सोलापूर ः सोलापूर जिल्हास्तरीय पुरुष व महिला गट अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत किरण स्पोर्ट्स क्लब संघाने पुरुष व महिला या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
ह दे प्रशालेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेची पारितोषिके सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त रेवणसिद्ध बिज्जरगी, सिद्धाराया होर्टीकर, विजय शाबादी व निवृत्त तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव यांच्या हस्ते देण्यात आली. विजयी संघाचे सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी अभिनंदन केले
पुरुष संघासाठी राजेश विजय शाबादी यांच्या स्मरणार्थ शाबादी परिवारातर्फे तर महिलांसाठी विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ विश्वस्त रेवणसिद्ध बिज्जरगी व गणेश कोळी यांच्यातर्फे फिरता करंडक व सोलापूर शहर पोलिस संघातर्फे प्रथम, द्वितीय व तृतीय संघासाठी करंडक व सर्वोत्कृष्ट अष्टपैलू आक्रमक व संरक्षक या खेळाडूंसाठी ट्रॉफ्या देण्यात आल्या. या स्पर्धेसाठी उत्कर्ष क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक आशिष अवधूर्ती व त्यांचे खेळाडूनी तर शहर पोलिस संघाचे सुनील चव्हाण, सचिन हार, वैभव लिगाडे, अर्जुन पवार व अमित कांबळे यांनी सहकार्य केले.

यावेळी सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस ए बी संगवे, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सहखजिनदार सोमनाथ बनसोडे, सहसचिव मोहन रजपूत, राजाराम शितोळे, शरद व्हनकडे, संतोष कदम, अजित शिंदे, निवड समिती सदस्य धोंडीराम पाटील, विजय दत्तू व उमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत पंच म्हणून पुंडलिक कलखांबकर, लखन कांबळे, विजय अडगळे, श्रीकांत खटके, श्रीकांत चव्हाण, नौशाद मुजावर, शिवशंकर राठोड, शेखलाल शेख, अनिकेत जाधव, श्रीकृष्ण कोळी, सागर बगले,अक्षय पवार, आनंद जगताप, सुरज शेवाळे, मधुकर राठोड यांनी काम पाहिले.
अंतिम निकाल
पुरुष गट : १. किरण स्पोर्ट्स क्लब सोलापूर, २. अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ वेळापूर, ३. उत्कर्ष क्रीडा मंडळ सोलापूर.
महिला गट : १. किरण स्पोर्ट्स क्लब सोलापूर, २. वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली, ३. कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लब वाडीकुरोली.
सर्वोत्कृष्ट खेळाडू
अष्टपैलू : सौरभ चव्हाण, सादिया मुल्ला (दोघे किरण स्पोर्ट्स).
संरक्षक : जुबेर शेख (उत्कर्ष), अर्चना व्हनमाने (किरण स्पोर्ट्स).
आक्रमक : अजित रणदिवे (वेळापूर), स्नेहा लामकाने ( वाडीकुरोली).