
आंतर महाविद्यालयीन टग ऑफ वॉर स्पर्धा
नागपूर ः आरटीएमएनयू आंतर महाविद्यालयीन टग ऑफ वॉर चॅम्पियनशिप स्पर्धेत नागपूरच्या अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालय महिला संघाने अजिंक्यपद मिळवले.
आंतर महाविद्यालयीन टग ऑफ वॉर अजिंक्यपद स्पर्धेत अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालय महिला संघाने शानदार कामगिरी बजावत विजेतेपद पटकावले. या संघात आलिया अर्शिया, महेक शेख, सना इक्बाल, खुशीगौर, क्वादिरुन्निसा, प्राची ताकसांडे, निलाक्षी कुंभारे, आस्था, फिजा शेख या खेळाडूंचा समावेश आहे.
या स्पर्धेत अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रज्ञान नागपूर संघाने प्रथम, अंजुम गर्ल्स डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स नागपूर संघाने द्वितीय व एस के पोरवाल कॉलेज संघाने तिसरा क्रमांक संपादन केला.
अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर टग ऑफ वॉर पुरुष संघाने उपविजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत नागपूरच्या जी एच रायसोनी मॅनेजमेंट कॉलेज संघाकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच आरटीएमएनयू टग ऑफ वॉर महिला इंटर-कॉलेजिएट चॅम्पियनशिप मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. अंजुमन गर्ल्स डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स नागपूरला २-० असा पराभव करून अंजूमनने टग ऑफ वॉर बॉईज टीम रनर अप चॅम्पियनशिप जिंकली.
या संघात सौरभ कनोजिया (कर्णधार), गुफ्रान सिद्दीक, फराज क्वाझी, सुमीत गजभिये, अम्मार खान, आर्यन आवळे, शशांक चवरे, फरहान मंसुरी, प्रेम बामनेले, अमान अन्सारी या खेळाडूंचा समावेश आहे.
या स्पर्धेत जी एच रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालय नागपूर संघाने प्रथम, अंजुमन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय नागपूर संघाने द्वितीय आणि एस. के. पोरवाल कॉलेज संघाने तिसरा क्रमांक मिळवला.
अंजुमन अभियांत्रिकी टग ऑफ वॉर पुरुष आणि महिला संघाचे अंजुमनहमी-ए-इस्लाम संस्थेचे प्रशासक व न्यायमूर्ती जकाहक, सेवानिवृत्त संयुक्त आयकर आयुक्त व सीईओ जनाबअनीस अहमद यांनी अभिनंदन केले आणि सत्कार केला. या प्रसंगी अंजुमन हामी-ए-इस्लाम, नागपूर, न्यायमूर्ती अहमद सईद, अंजुमन हामी-ए-इस्लाम, नागपूरते अब्दुल नजीर शेख आणि अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नागपूरचे प्राचार्य डॉ के एस झाकीउद्दीन आणि क्रीडा उपसंचालक डॉ झाकीर एस खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
आंतर महाविद्यालयीन टग ऑफ वॉर अजिंक्यपद स्पर्धा गोंदिया येथील डी बी सायन्स कॉलेज येथे आयोजित केली होती. या स्पर्धेचे नियोजन डॉ अजाज शेख यांनी केले आणि स्पर्धेचे तांत्रिक प्रभारी नागपूर जिल्हा टग ऑफ वॉर असोसिएशनचे सरचिटणीस धैर्यशील शुटे यांनी सांभाळली. या स्पर्धेत सुमारे ३० महाविद्यालयीन संघांनी भाग घेतला होता.