राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत धाराशिव जिल्हा संघाची चमकदार कामगिरी 

  • By admin
  • February 28, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

मुरुमच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलला सहा पदके 

उमरगा :  राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत धाराशिव जिल्हा संघाने चमकदार कामगिरी बजावत तिसरा क्रमांक मिळवला. 

पहिली राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा कोल्हापूर येथे झाली. या स्पर्धेत एकूण १४ जिल्ह्यांतील ४१० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये धाराशिव जिल्हा संघाने तृतीय क्रमांक संपादन केला.

यावेळी दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप लाड, सचिव बाला साठे, खजिनदार गौतम विधाते, सहसचिव अजय शहा, सहखजिनदार महमद रफी शेख, ज्येष्ठ वस्ताद आनंदराव ठोंबरे, शस्त्र व शास्त्र विशारद आणि लेखक वस्ताद विनायक चोपदार, वस्ताद मनोज बालिंगेकर, दांडपट्टा महाराष्ट्राचे सदस्य दीपाली साठे, सुभाष मोहिते, दांडपट्टा इंडियाचे अध्यक्ष संभाजी अहिरराव यांची उपस्थिती होती.

या स्पर्धेत उमरगा तालुक्यातील गुरुकुल प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मुरूम,डॉ रामानुजन इंग्लिश मीडियम स्कूल उमरगा, कुमार स्वामी विद्या मंदिर उमरगा, शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा, श्री महात्मा बसवेश्वर विद्यालय उमरगा, छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज उमरगा या शाळांनी सहभाग घेतला होता.

पहिली राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत धाराशिव संघाच्या वतीने स्वरांजली मामले (प्रथम), स्वरा पाटील (प्रथम), प्रत्युषा सोमवंशी (प्रथम), अनन्या पांगे (तृतीय), आरती पांगे (तृतीय), अक्षरा स्वामी (तृतीय), समृद्धी टोपगे (द्वितीय), श्रेया अंकुशे (तृतीय) यांनी घवघवीत यश संपादन केले. 

मुलांच्या गटात आयुष्य पवार (प्रथम), रोमन सैनी (द्वितीय), साहील शेख (प्रथम), करण जाणे (तृतीय), गोविंद रूपणूर (प्रथम), राजवीर चौधरी (द्वितीय), अभय मोरे (प्रथम) यांनी सहभागी होऊन चमकदार यश संपादन केले. 

जिल्हा संघटनेच्या वतीने यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पहिल्या राष्ट्रीय दांडपट्टा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. ही स्पर्धा २१ व २२ एप्रिलमध्ये या तारखेमध्ये लोणावळा (पुणे) महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित होणार आहे.

सर्व खेळाडूंचे गुरुकुल प्री प्राइमरी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका मयुरी चौधरी व संस्थेचे सचिव आनंद चौधरी, डॉ रामानुजन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका गंगा अंबर, संस्थेचे अध्यक्ष महेश अंबर, मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे, कुमार स्वामी शाळेचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेच्या वतीने टेक्निकल विभाग प्रमुख आदिनाथ गोरे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *