राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाला विजेतेपद 

  • By admin
  • February 28, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

पुरुष गटात महाराष्ट्र संघाला तृतीय पारितोषिक 

अमरावती ः अमरावती येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने तिसरा क्रमांक मिळवला. 

भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन व महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत अमरावती जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ पुरुष आणि महिला राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुरुष गटात छत्तीसगड प्रथम, मध्य प्रदेश द्वितीय तर महाराष्ट्र संघास तृतीय स्थान मिळाले. महिला गटात महाराष्ट्र प्रथम, पंजाब द्वितीय तर केरळ संघास तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सुलभाताई खोडके या  होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर विलास इंगोले, प्रीतीताई बंड, भारतीय सॉफ्टबॉल महासंघाच्या उपाध्यक्ष लक्ष्मीप्रिय शाहू, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, रूपलाल शर्मा, सचिव प्रवीण अनावकर, राजस्थानचे शाकेर आली व सुबोध मिश्रा, हरियाणाचे सतबीर सिंग, राजवीर सिंग, पंजाबचे सुखराम सिंह, तेलंगणाचे शोभन बाबू, किशोर चौधरी, दर्शना पंडित, आयोजन समितीचे प्रमुख सुरजसिंग येवतीकर, सहसचिव गोकुळ तांदळे, रमाकांत बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशनचे कोषाध्यक्ष संतोष चव्हाण, एल. आर. मौर्य यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी राज्य सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, रूपलाल शर्मा, श्रीकांत थोरात, रमाकांत बनसोडे, सहसचिव गोकुळ तांदळे, आयोजक सुरज सिंग येवतीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी वाय जे अशर, विकास येवतीकर, मिलिंद तळेले, संगीता येवतीकर, प्रसेनजीत बनसोडे, नारायण बत्तुले, रफिक जमादार, मधुवंती पारगावकर, भारतीय रेफ्री समितीचे मुकुल देशपांडे, यश खोडके, प्रमोद इंगोले, पंकज गुल्हणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्य सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर यांनी स्पर्धेची संपूर्ण माहिती दिली.

महाराष्ट्र पुरुष आणि महिला संघाला प्रशिक्षक मिलिंद दर्प, अभिजीत इंगोले, गणेश बटूदे, जयंत जाधव, प्रीतीश पाटील, संगीता येवतीकर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुरजसिंग येवतीकर यांनी केले. रुपाली इंगोले यांनी आभार मानले.

विजेता महिला संघ

ऐश्वर्या पुरी, श्रावणी चौघुले, करिश्मा कुडचे, माधुरी महाजन, दिव्या ढाकरे, चुंगडे, प्रीती कांबळे, ऐश्वर्या बोडखे, अश्विनी गिरी, रहेनुमा शेख, ऐश्वर्या भास्करन, अंजली पवार, साधना पवार, सई जोशी, सप्तश्री येवतीकर, सोनाली थोरात, क्षितिजा आठवले, माधुरी साळुंखे, रोहिणी नवगण, शिवानी वरखेडे, उर्वशी शनेश्वर.

पुरुष संघ

कुणाल शिंदे, रोहन राऊत, सुमेध तळवेलकर, जयेश मोरे, कल्पेश कोल्हे, ऋषिकेश काळे, सौरभ टोकसे, प्रतीक डुकरे, ऋत्विक कुडवे, हर्षद जळमकर, राजेश्वर पांगारकर, प्रशांत जाधव, ऋषिकेश पाटील, अभिषेक शेलोकर, व्यंकटेश झिपरे, सिद्धांत पवार, निखिल शिंदे, तेजस बोबडे, राजेश भट, वेदांत राऊत, ऋषभ जिडेवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *