बार्शी येथे आजपासून विभागीय निमंत्रित पुरुष खो-खो स्पर्धा

  • By admin
  • March 1, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे मामा यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

सोलापूर ः कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे मामा यांच्या १२२व्या जयंती निमित्त बार्शीतील कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या कर्मवीर क्रीडांगणावर पुरुष गटाच्या विभागीय निमंत्रित खो-खो स्पर्धेला रविवारी (२ मार्च) सुरुवात होणार आहे.

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी यांनी ही स्पर्धा महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर अम्युचर खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा ४ मार्चपर्यंत आयोजित केली आहे. या स्पर्धेत यजमान सोलापूर जिल्ह्यासह सातारा व धाराशिव जिल्ह्यातील ८ संघांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील विजयी उपविजयी व तृतीय संघास अनुक्रमे २१, १५ व ११ हजार रुपयांचे पारितोषिक व करंडक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी दुपारी चार वाजता कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शीचे प्राचार्य एस एस गोरे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, खजिनदार जयकुमार शितोळे, विश्वस्त डॉ सी एस मोरे, माजी जनरल सेक्रेटरी व्ही एस पाटील, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ चंद्रजित जाधव, साई डेव्हलपर्स बार्शीचे सतीश अंधारे, सोलापूर अॅम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, सचिव अजित कुमार संगवे, स्पर्धा निरीक्षक प्रवीण बागल, भारतीय महिला खो-खो संघाची खेळाडू अश्विनी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल, असे स्पर्धेचे सचिव एस एस मारकड यांनी कळविले आहे

स्पर्धेची गटवार विभागणी

अ गट : छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ (धाराशिव), शिवप्रतिष्ठान क्लब (मंगळवेढा), किरण स्पोर्ट्स क्लब (सोलापूर), ओगलेवाडी स्पोर्ट्स क्लब (सातारा).

ब गट : अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ (वेळापूर), स्वराज्य क्रीडा मंडळ (सातारा), उत्कर्ष क्रीडा मंडळ (सोलापूर), श्री तुळजाभवानी क्रीडा मंडळ (धाराशिव).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *