
लाईफलाइन-मासिया औद्योगिक क्रिकेट स्पर्धा ः सूरज गोंड सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाइन-मासिया औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया सामन्यात ग्रामीण पोलिस संघाने कॅनरा बँक संघावर दहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात सूरज गोंड हा सामनावीर ठरला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. कॅनरा बँक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १९.४ षटकात सर्वबाद ९५ धावा काढल्या. ग्रामीण पोलिस संघाने अवघ्या ९ षटकात बिनबाद ९८ धावा फटकावत दहा विकेट राखून मोठा विजय नोंदवला.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात सूरज गोंद याने ३८ चेंडूत ४८ धावांची धमाकेदार खेळी साकारली. सूरजने पाच चौकार व दोन उत्तुंग षटकार ठोकले. विकास नगरकर याने १७ चेंडूत २८ धावांची आक्रमक खेळी केली. विकासने सहा चौकार मारले. स्वप्नील बंदे याने तीन चौकारांसह २१ धावा काढल्या. गोलंदाजीत निखिल पालेपवाड याने ७ धावांत तीन विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. सूरज गोंड याने १९ धावांत तीन गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी नोंदवली. संजय सपकाळ याने १५ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः कॅनरा बँक ः १९.४ षटकात सर्वबाद ९५ (प्रणीत दीक्षित १४, आकाश अभंग ११, ज्ञानोजी गायकवाड १०, धीरज बहुरे १२, स्वप्नील बंदे २१, नितीश तांबिले ८, निखिल पालेपवाड ३-७, सूरज गोंड ३-१९, संजय सपकाळ २-१५, हिंदुराव देशमुख १-२२, फिरोज पठाण १-११) पराभूत विरुद्ध ग्रामीण पोलिस ः ९ षटकात बिनबाद ९८ (सूरज गोंड नाबाद ४८, विकास नगरकर नाबाद २८, इतर २२). सामनावीर ः सूरज गोंड.