
प्रत्येकाने आपल्यामधील खेळाडू जीवंत ठेवावा ः डॉ विक्रांत भाले
छत्रपती संभाजीनगर ः प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आरोग्यासाठी खेळावे व खेळामुळे मन प्रसन्न राहते, मानसिक कणखरपणा येतो, नियोजन, अंदाज अशा गोष्टी शिकायला मिळतात. प्रत्येकाने आपल्यामधील खेळाडू जीवंत ठेवावा असे मत लाइफलाइन मेडिकल डिव्हायसेस कंपनीचे संचालक डॉ विक्रांत भाले यांनी व्यक्त केले.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (मसिआ) आणि लाईफलाइन मेडिकल डिव्हाईसेस कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मसिआ इंडस्ट्रियल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी स्पर्धेचे मुख्य प्रायोजक मे लाईफलाइन मेडिकल डिव्हाईसेस प्रा ली चे संचालक डॉ विक्रांत भाले यांच्या हस्ते गरवारे क्रिकेट स्टेडियम येथे करण्यात आले. यावेळी मसिआ अध्यक्ष चेतन राऊत, उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, मनीष अग्रवाल, तसेच स्पर्धेचे सहप्रायोजक मे. एन्ड्रेस हाऊझरचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र कुलकर्णी आणि मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदीप तुळापुरकर, तर सहयोगी प्रायोजक सुपर्ब पॉलीपॅक, अभिषेक अॅडव्हरटायसिंग, हेल्थ अँड हार्मोनी, क्युबेटीक इंजीनियर प्रा ली, रिवॉर्ड एलइडी स्टुडिओ, तसेच स्पोर्ट्स पार्टनर म्हणून प्रल्हाद स्पोर्टस यांच्या प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

लाईफलाइन प्रेझेंट मसिआ इंडस्ट्रियल क्रिकेट स्पर्धा गरवारे स्टेडियम येथे १ ते २३ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आली असून एकूण २० संघ यामध्ये खेळणार आहेत. त्यातील १० टीम औद्योगिक तर १० टीम सर्विस सेक्टर/शासकीय विभागातील आहेत.
या स्पर्धेसाठी सर्व टीमला यावेळी मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आणि सर्व प्रयोजकांचे आभार व्यक्त केले. मसिआ आपल्या सामाजिक बांधीलकीतून कसे वेगवेगळे कार्य करत आहे आणि तसेच छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग विकासासाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली. या स्पर्धेमुळे उद्योजकात अनेक चांगले बदल घडत असतात. उद्योजकाने नेहमीच्या ताणतणावातून स्वतःच्या आरोग्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. अध्यक्ष यांनी सर्व सहभागी टीम मधील सर्व खेळाडूवृत्तीने आपल्या कडून चांगला खेळ व्हावा या उद्देशाने खेळावे आणि तसेच नागरिकांनी देखील गरवारे स्टेडियमला भेट देऊन या खेळाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले.

स्पर्धेसाठी सह प्रायोजकत्व घेतलेले एन्ड्रेस हाऊझरचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र कुलकर्णी आणि मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदीप तुळापुरकर यांनी देखील सर्व सहभागी टीमला शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मसिआ अध्यक्ष चेतन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन स्पोर्ट्स सेक्रेटरी अजिंक्य पाथ्रीकर, संयोजक मसिआ स्पोर्ट्स कमिटी, तसेच कमिटी सदस्य मयूर चौधरी, निखिल कदम, निकीत चौधरी, केतन गोडबोले, सूरज चामले, गिरीश खत्री, नितीन कडावकर, राजेश शिंदे यांनी केले आहे आदि उद्योजक सदस्य परिश्रम घेत आहेत.
यावेळी मसिआचे उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, मनीष अग्रवाल, सहसचिव सचिन गायके, कार्यकारिणी सदस्य राजेश विधाते, मिलिंद कुलकर्णी, मंगेश निटुरकर यांच्यासह सर्व सहभागी टीमचे कर्णधार, उपकर्णधार आणि खेळाडू इत्यादींची उपस्थिती होती, असे प्रसिद्धी प्रमुख सुरेश खिल्लारे आणि सह-प्रसिद्धी प्रमुख जगदीश जोशी यांनी सांगितले.