
नागपूर : नॅशनल पॉवर लिफ्टर्स फेडरेशनद्वारे दुबई, युएई येथे ग्लोबल पॉवर अलायन्सच्या ग्लोबल पॉवर फेडरेशन (युक्रेन) च्या संयुक्त विद्यमाने आशियाई सिंगल इव्हेंट बेंच प्रेस ऑफ डेड लिफ्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत महाराष्ट्राचे पॉवरलिफ्टर्स सुनील फुलझेले, महाराष्ट्राचे सुशील ठाकरे यांनी एम २-८३ किलो बीडब्ल्यूटी मध्ये सिंगल इव्हेंट बेंच प्रेसमध्ये सुवर्णपदके जिंकली. कॅट याने अनुक्रमे ९७.५ किलो आणि बीडब्ल्यू एम २-९३ किलो वजनासह ८५ किलो वजन उचवून सुवर्ण पदके जिंकले. महाराष्ट्राचे महेश पानसे आणि सुभाष कामडी यांनी पंच म्हणून काम पाहिले. एनपीएफचे जनरल सेक्रेटरी लिओ पीटर यांनी त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.