डॉक्टर्स इलेव्हनचा जीएमसीएच टीमवर मोठा विजय 

  • By admin
  • March 2, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

लाईफलाइन-मासिआ औद्योगिक क्रिकेट ः सम्राट  गुटे सामनावीर 

छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाइन-मासिआ औद्योगिक टी २० क्रिकेट लीग स्पर्धेत डॉक्टर्स इलेव्हन संघाने जीएमसीएच टीमचा पाच विकेट राखून पराभव केला.या लढतीत सम्राट गुटे याने सामनावीर किताब पटकावला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. जीएमसीएच टीमने प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकात सर्वबाद १३३ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना डॉक्टर्स इलेव्हनने १४.२ षटकात पाच बाद १३९ धावा फटकावत पाच विकेटने सामना जिंकला.  

या सामन्यात डॉ सुनील काळे याने ३० चेंडूत ४० धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याने एक षटकार व सहा चौकार मारले. अर्जुन पटेल याने २२ चेंडूत ३७ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने तीन चौकार मारले. डॉ कार्तिक बाकलीवाल याने अवघ्या १४ चेंडूत ३३ धावांची स्फोटक खेळी केली. त्यात त्याने आठ चौकार ठोकले. गोलंदाजीत सम्राट गुटे याने २१ धावांत चार विकेट घेत आपला ठसा उमटवला. राजेश चौधरी याने १८ धावांत दोन गडी बाद केले. रितेश जाधव याने १६ धावांत दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक ः जीएमटीएच टीम ः १९.५ षटकात सर्वबाद १३३ (मिलिंद तोगरवाड ११, स्वप्नील जेजूरकर २६, अमोल दौड १०, रितेश जाधव ६, अर्जुन पटेल नाबाद ३७, इतर ४०, सम्राट गुटे ४-२१, राजेश चौधरी २-१८, आकाश डुकले २-२५, डॉ ज्ञानेश्वर बनकर १-२२, राजेंद्र चोपडा १-२६) पराभूत विरुद्ध डॉक्टर्स इलेव्हन ः १४.२ षटकात पाच बाद १३९ (डॉ सुनील काळे ४०, डॉ कार्तिक बाकलीवाल ३३, मनोज ताजी २१, सम्राट गुटे नाबाद ७, आकाश डुकले नाबाद १३, इतर १९, रितेश जाधव २-१६, दादासाहेब २-२७, अर्जुन पटेल १-२७). सामनावीर ः सम्राट गुटे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *