
परभणी ः जागतिक व भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या वतीने वडोदरा गुजरात येथे पार पडलेल्या जागतिक युवा टेबल टेनिस मालिकेत परभणीच्या आद्या महेश बाहेती हिने भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलींच्या वयोगटात उपांत्य फेरी खेळताना आद्या बाहेती हिला अवनी दुवा या खेळाडूंकडून (११-३, ११-८, ७-२२, ९-११, ९-११) असा निसटता पराभव स्वीकारावा. त्यामुळे आद्या बाहेती हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
आद्या बाहेती खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र परभणी येथे प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांच्याकडे प्रशिक्षण घेते. तसेच अनिल बंदेल, सचिन पुरी, असद आली, अजय कांबळे यांचे मार्गदर्शन मिळले तर ऐश्वर्या पाटील फिजिओ म्हणून आद्या सोबत काम करत आहेत. आद्या स्कॉटिश अकॅडमी या शाळेत इयत्ता चौथी इयत्तेत शिकत आहे.
या घवघवीत यशाबद्दल भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना अध्यक्ष प्रवीण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, संजय कडू, ॲड आशितोष पोतनीस, आशिष बोडस, सर्व पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, कल्याण पोले, क्रीडा अधिकारी ननाकसिंह बस्सी, सुयश नाटकर, रोहन औंढेकर, परभणी जिल्हा अध्यक्ष समशेर वरपुडकर, जिल्हा सचिव आणि राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, डॉ माधव शेजुळ, संतोष सावंत, परभणी क्लबचे सचिव डॉ विवेक नावंदर, पवन कदम, पियूष रामावत, तुषार जाधव, सूरज भुजबळ, रोहित जोशी, साक्षी देवकाते, भक्ती मुक्तावार या वरिष्ठ खेळाडू, पालक सराव सवंगडी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
आद्या बाहेती आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेता ठरली. आद्या हिचे सेलू रेल्वे स्टेशनवर प्रा संजय पिंपळगावकर, प्रा महेश कुलकर्णी, जिल्हा सचिव गणेश माळवे, ॲड गिरीष साडेगांवकर यांनी स्वागत केले तर परभणी रेल्वे स्टेशन परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या खेळाडू वतीने तुषार जाधव, मनोहर पुरी, संगीता पुरी, हर्षवर्धन घाडगे, संजय प्रधान, डॉ महेश बाहेती यांनी सत्कार केला.