
लिजंड्स प्रीमियर लीग क्रिकेट ः शेख सादिक सामनावीर, जावेद खान चमकला
छत्रपती संभाजीनगर ः लिंजड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात नॉन स्ट्रायकर्स संघाने श्लोक वॉरियर्स संघाचा ६५ धावांनी पराभव केला. या सामन्यात शेख सादिक याने सामनावीर किताब संपादन केला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. नॉन स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत संघाला २० षटकात नऊ बाद १८४ अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर या धावसंख्येचा पाठलाग करताना श्लोक वॉरियर्स संघ २० षटकात सहा बाद ११९ धावा काढू शकला. नॉन स्ट्रायकर्स संघाने ६५ धावांनी सामना जिंकत आगेकूच केली.
या सामन्यात शेख सादिक याने ४१ चेंडूत ५९ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी साकारली. सादिकने एक षटकार व सहा चौकार मारले. शशांक चव्हाण याने ३१ चेंडूत ४३ धावांची वेगवान खेळी केली. त्याने सात चौकार मारले. राजेश शिंदे याने केवळ १८ चेंडूत ३० धावांची दमदार खेळी केली. त्याने चार चौकार मारले. गोलंदाजीत शेख सादिक याने ४ षटकात केवळ १२ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेत सामना गाजवला. जेके याने ३२ धावांत तीन गडी बाद केले. सय्यद फरहान याने ३२ धावांत दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक ः नॉन स्ट्रायकर्स ः २० षटकात नऊ बाद १८४ (आसिफ खान ८, अमोल दौड २२, शेख सादिक ५९, सिद्धांत पटवर्धन ९, राजेश शिंदे ३०, लहू लोहार ८, जी सचिन २२, सुमित आगरे नाबाद ६, जयेश वैष्णव नाबाद २, जेके ३-३२, मयूर अग्रवाल २-३४, सय्यद फरहान २-३२, वहाब १-३७, अनंत नेरळकर १-३१) विजयी विरुद्ध श्लोक वॉरियर्स ः २० षटकात सहा बाद ११९ (मयूर अग्रवाल १९, सय्यद फरहान २१, जेके १८, अनंत नेरळकर ९, शशांक चव्हाण नाबाद ४३, शेख सादिक ३-१२, राजेश शिंदे १-२६, गिरीश खत्री १-२५, लहू लोहार १-३). सामनावीर ः शेख सादिक.