
लाईफलाइन-मासिआ औद्योगिक क्रिकेट ः संदीप खोसरे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाइन-मासिआ औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत शेंद्रा कंबाइंड इंडस्ट्रीज संघाने अटीतटीच्या सामन्यात जॉन्सन अँड जॉन्सन संघावर नऊ धावांनी रोमांचक विजय मिळवला. या लढतीत संदीप खोसरे याने सामनावीर किताब पटकावला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. शेंद्रा कंबाइंड इंडस्ट्रीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात चार बाद १४५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. जॉन्सन अँड जॉन्सन संघ २० षटकात सहा बाद १३६ धावा काढू शकला. शेंद्रा कंबाइंड इंडस्ट्रीज संघाने अवघ्या ८ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात संदीप खोसरे याने ६२ चेंडूत ७८ धावांची दमदार खेळी केली. त्याने १३ चौकार मारले. अनिरुद्ध पुजारी याने ५४ चेंडूत ५१ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी साकारली. त्याने चार चौकार मारले. अनिरुद्ध शास्त्री याने ३४ चेंडूत ३१ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार मारले. गोलंदाजीत सहज लांबा याने २२ धावांत दोन तर बन्सी गपट याने २३ धावांत दोन गडी बाद केले. पांडुरंग रोडगे याने ११ धावांत एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक ः शेंद्रा कंबाइंड इंडस्ट्रीज ः २० षटकात चार बाद १४५ (संदीप तुपे ६, संदीप खोसरे नाबाद ७८, सौरव बिराजदार ८, राहुल पाटील २४, पवन कावळे नाबाद १३, इतर १६, सचिन सबनीस १-३४, पांडुरंग रोडगे १-११, कन्ना भिराम चक्का १-२७, अनिरुद्ध पुजारी १-२९) विजयी विरुद्ध जॉन्सन अँड जॉन्सन ः २० षटकात सहा बाद १३६ (हेमंत मिठावाला ६, अनिरुद्ध शास्त्री नाबाद ५१, प्रवीण क्षीरसागर २९, इतर १६, सहज लांबा २-२२, बन्सी गपट २-२३, संदीप तुपे १-२२, भूपेश देशमुख १-१२). सामनावीर ः संदीप खोसरे.