
सोलापूर ः सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने फिट इंडिया अंतर्गत संडे ऑन सायकल रॅलीचे आयोजन केले होते.
देशातील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी केंद्रशासन खेलो इंडिया योजनेच्या फिट इंडिया या मोहिमेअंतर्गत फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. त्यानिमित्ताने नेहरूनगर शासकीय मैदानावरून संडे ऑन सायकल रॅली काढण्यात आली. निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव यांच्या हस्ते याचे उदघाटन झाले. यात जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, क्रीडा अधिकारी नदीम शेख, शैलेंद्र माने, ज्येष्ठ नागरिक विजय शाबादी, जॉगर्स फाऊंडेशनचे संतोष कदम, यशवंत पाथरूट तसेच श्री स्वामी समर्थ अकॅडमीचे खेळाडू सहभागी झाले होते. शासकीय मैदान, इंचगिरी मठ, माशाळ वस्ती, राजस्व नगर, सिध्देश्वर वन विहार ते परत शासकीय मैदान नेहरु नगर येथे या सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.