
लाईफलाइन-मासिआ औद्योगिक क्रिकेट : परवेझ सय्यद सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : लाईफलाइन-मासिआ औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत गुड ईयर संघाने सीमेन्स एनर्जीझर्स संघाचा २६ धावांनी पराभव करत आगेकूच केली. या लढतीत परवेझ सय्यद याने सामनावीर पुरस्कार पटकावला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. सीमेन्स एनर्जीझर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुड ईयर संघाने प्रथम फलंदाजी करताना १८.४ षटकात सर्वबाद १४६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सीमेन्स संघ या धावसंख्येचा पाठलाग करताना २० षटकात सहा बाद १२० धावा काढू शकला. गुड ईयर संघाने हा सामना २६ धावांनी जिंकत आगेकूच केली.

या सामन्यात सुनील जाधव याने २७ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. सुनीलने चार चौकार मारले. अजय गव्हाणे याने २७ धावा फटकावताना दोन उत्तुंग षटकार ठोकले. निलेश जाधव याने तीन चौकारांसह १९ धावांची वेगवान खेळी साकारली. गोलंदाजीत अमोल गवळी याने २७ धावांत तीन विकेट घेत ठसा उमटवला. परवेझ सय्यद याने १२ धावांत दोन बळी घेतले. समीर धवलशंख याने १४ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : गुड ईयर : १८.४ षटकात सर्वबाद १४६ (ऋषिकेश तरडे १५, जय हार्डे १३, सुनील जाधव ३४, अविष्कार नन्नावरे १५, जीवन अवस्थी ७, सागर दुबे ५, परवेझ सय्यद नाबाद १५, जितेंद्र निकम ५, मोनू वर्मा ६, इतर ३०, अमोल गवळी ३-२७, अभिजीत मोरे २-३१, समीर धवलशंख २-१४, मकरंद भारस्कर १-१२, सौरव राय १-३३, विश्वेश लोंढे १-११) विजयी विरुद्ध सीमेन्स एनर्जीझर्स : २० षटकात सहा बाद १२० (हिमांशू गिरी १०, निलेश जाधव १९, अजय गव्हाणे २७, नितीन निकम १४, अभिजीत मोरे १५, अझहर नाबाद ११, समीर धवलशंख ६, इतर १५, सागर दुबे २-३४, परवेझ सय्यद २-१२, अविष्कार नन्नावरे १-१७, जितेंद्र निकम १-१९). सामनावीर : परवेझ सय्यद.