
सोलापूर ः भारतीय संघाची कर्णधार म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या सोलापूर येथील संध्याराणी बंडगर हिला सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या वतीने एक लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे.
एक लाख रकमेचा धनादेश संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप बच्चूवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा संघटनेचे मानद संयुक्त सचिव पंकज शहा, सचिव राजीव देसाई व कोषाध्यक्ष दिलीप अत्रे उपस्थित होते.
टर्की येथे इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनने ९ ते १४ मार्च या कालावधीत आयोजित केलेल्या वर्ल्ड मास्टर्स चॅम्पियनशिप लॉन टेनिस स्पर्धेमध्ये संध्याराणी बंडगर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.