अहमदाबाद येथे अल्टिमेट टेबल टेनिस लीगचे सहावे पर्व

  • By admin
  • March 3, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

२९ मेपासून लीगला सुरुवात, आठ संघांचा सहभाग
 

अहमदाबाद : भारतातील प्रमुख टेबल टेनिस लीग अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) चे सहावे पर्व २९ मे ते १५ जून दरम्यान होणार आहे. अहमदाबाद शहरात  पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यूटीटी एकेक यशोशिखर चढत असताना अव्वल भारतीय आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्टार्सचे गतिमान मिश्रण असलेले आठ संघ जेतेपदासाठी लढतील. गतविजेता संघ गोवा चॅलेंजर्स ऐतिहासिक तिसरे विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करतील.

अहमदाबाद हे शहर भारताच्या क्रीडा परिसंस्थेत वेगाने आपले स्थान निर्माण करत आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह आणि नजीकच्या भविष्यात २०३० युवा ऑलिम्पिक आणि २०३६ ऑलिम्पिक खेळांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन करण्याचे स्वप्न असलेल्या अनेक क्रीडा प्रकारांसाठी एक आकर्षण केंद्र बनत आहे. हे शहर यूटीटी सीझन सहाव्या आवृत्तीचे स्वागत करत असताना चाहत्यांना जागतिक दर्जाचे टेबल टेनिस, एक प्रमुख ऑलिम्पिक खेळ जवळून पाहण्याची, रोमांचक सामन्यांमध्ये अव्वल भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्टार्सना थेट लढताना पाहण्याची रोमांचक संधी मिळेल.

टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने नीरज बजाज आणि विटा दानी यांनी प्रमोट केलेल्या यूटीटीने २०१७ पासून भारतीय टेबल टेनिसमध्ये क्रांती घडवून आणली आहे. उदयोन्मुख खेळाडूंसोबत जागतिक दर्जाच्या प्रतिभेचा समावेश करून, राष्ट्रीय स्तरावर या खेळाचे व्यक्तिमत्व उंचावले आहे.

यूटीटी चे सह-प्रवर्तक निरज बजाज आणि विटा दानी यांनी या खेळाची व्याप्ती वाढवण्याच्या लीगच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. यूटीटीसोबत आमचे एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे या खेळाला नवीन ठिकाणी नेणे आणि भारतात टेबल टेनिससाठी व्यापक प्रेक्षक तयार करणे. अहमदाबाद आणि गुजरात हे ऑलिम्पिक खेळांसाठी वेगाने मजबूत केंद्र म्हणून उदयास येत आहेत, विशेषतः भविष्यात ऑलिम्पिकचे आयोजन करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना गती मिळत आहे. सीझन ६ येथे आणणे ही त्या वाढीला आणखी बळकटी देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. नवीन प्रदेशांमध्ये जागतिक दर्जाच्या प्रतिभेचे प्रदर्शन करून, यूटीटी खेळाडू आणि चाहत्यांच्या पुढील पिढीला प्रेरणा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 
अहमदाबादमध्ये अव्वल दर्जाचा टेबल टेनिसचा थरार आणण्यास आणि जागतिक क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने भारताच्या प्रवासात योगदान देण्यास आम्हाला उत्सुकता आहे.”

अल्टीमेट लीगची महत्त्वाची भूमिका ः कमलेश मेहता 

टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव कमलेश मेहता म्हणाले, “अल्टिमेट टेबल टेनिसने भारतातील टेबल टेनिस नकाशामध्ये बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आमच्या खेळाडूंना अव्वल आंतरराष्ट्रीय प्रतिभेविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी एक अतुलनीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक हंगामात, लीग स्पर्धेचा दर्जा उंचावते, तळागाळातील आणि अव्वल पातळीवर खेळाच्या वाढीस हातभार लावते. क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये वाढत्या गुंतवणूकीसह आणि प्रमुख स्पर्धांचे आयोजन करण्याच्या यशस्वी ट्रॅक रेकॉर्डसह, अहमदाबाद यूटीटी सीझन ६ साठी एक योग्य ठिकाण आहे. भारत एक मजबूत क्रीडा संस्कृती निर्माण करत असताना, नवीन शहरांमध्ये अव्वल दर्जाचे टेबल टेनिस आणल्याने खेळाची पोहोच आणि विकास आणखी वाढेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *