देवगिरी महाविद्यालयात वाणिज्य विभागाचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

  • By admin
  • March 3, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचा माजी विद्यार्थी मेळावा प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न झाला.

प्राचार्यांनी महाविद्यालयची विशेषता आणि महाविद्यालयाने विद्यार्थी किती मोठे केलेत तसेच महाविद्यलयाचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात काम करत आहेत हे सांगितले. माजी विद्यार्थ्यांमध्ये स्नेहा अशोक, डॉ लक्षकौशिक पुरी, डॉ श्रीकांत थोरात, डॉ संवेदी राणे, डिंपल भोजवानी, उमा खुरसाने, रवी चौधरी इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयाच्या अलीकडील काही वर्षातील कामगिरीबद्दल, महाविद्यालय स्वायत्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक जण सीए, कंपनी सचिव, प्राध्यापक, बँक व्यवस्थापक, सहायक अधिकारी, लेखापाल आदी मोठ्या पदावर कार्यरत आहेत. तसेच अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक बनले आहेत. विद्यार्थीनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आम्ही आमच्या प्राध्यापक आणि महाविद्यालयाने केलेल्या मार्गदर्शनामुळे मोठे झालोत आणि यशाची उतुंग भरारी घेतली.

माजी विद्यार्थी मेळाव्याच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी माजी विद्यार्थ्यांचे वर्षनिहाय व्हाट्सअप ग्रुप तयार करून वाणिज्य विभागातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे तसेच माजी विद्यार्थ्यांनी सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपला स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करावा, बँकिंगची व स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी त्याबद्दल मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच माजी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी असोसिएशनचे सदस्य व्हावे व त्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी काय योगदान करता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

आय क्यू ए सी डायरेक्टर डॉ सुनील टेकाळे यांनी नॅक दृष्टिकोनातून माजी विद्यार्थी मेळावा का आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले. या विद्यार्थी मेळाव्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ गणेश मोहिते, डॉ अपर्णा तावरे आणि आय क्यू ए सी डायरेक्टर डॉ सुनील टेकाळे व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ राजेश लहाने आणि विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. माजी विद्यार्थी मेळाव्याला विभाग प्रमुख डॉ राजेश लहाने यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सर्व माजी विद्यार्थी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम स्वागत केले. माझी विद्यार्थी मेळावा आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी एकूण ४७ माजी विद्यार्थी सर्व प्राध्यापक उपस्थित होते. माजी विद्यार्थी मेळावा समन्वयक डॉ अविनाश धोत्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ भाऊसाहेब शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *