
दुबई ः जखमी मॅथ्यू शॉर्टच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघात युवा फिरकी गोलंदाज अष्टपैलू कूपर कॉनोलीचा समावेश करण्यात आला आहे.
अफगाणिस्तान संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यान शॉर्ट याला पायाच्या हाडांना दुखापत झाली. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या २१ वर्षीय कोनोलीला स्पर्धेसाठी प्रवासी राखीव संघात स्थान देण्यात आले.
आयसीसी टूर्नामेंट तांत्रिक समितीने सोमवारी या बदलाला मान्यता दिली. कॉनोलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात तीन एकदिवसीय सामने आहेत. मंगळवारी पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ आक्रमक फलंदाज जेक फ्रेझर, मॅकगर्क किंवा कॉनोली यापैकी एकाला मैदानात उतरवू शकतो. तथापि, श्रीलंकेविरुद्धच्या अलीकडील दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये मॅकगर्क अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाचा भारतीय संघाविरुद्धचा सामना मनोरंजक असू शकतो. ट्रेविस हेड विरुद्ध भारतीय गोलंदाजांची कसोटी लागेल.