
छत्रपती संभाजीनगर ः एमपीपी स्पोर्ट्स पार्कचे मुख्य प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागर बडवे याने मुंबई येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला.
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे सन रॉक ते गेट वे ऑफ इंडिया अशी पाच किलोमीटर अंतराची राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सागर बडवे याने २६ ते ४५ वयोगटात तिसरा क्रमांक पटकावला. तसेच सागर बडवे याने पोरबंदर (गुजरात) येथे श्रीराम सी स्वीमिंग क्लबतर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत पाच व दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक संपादन केला आहे.