
छत्रपती संभाजीनगर ः वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मयूर ढसाळ याने शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
जम्मू काश्मीर येथे झालेल्या ६८व्या १९ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये संघिक सेबर प्रकारात वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मयूर ढसाळ याने सुवर्णपदक पटकावले. तामिळनाडू, हरियाणा, पंजाब, बिहार या संघांचा पराभव करून मयूर याने सुवर्ण यश प्राप्त केले.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजाराम राठोड, सचिव नितीन राठोड, प्राचार्य डॉ संजय शिंदे, प्रबंधक सीमा वडते, अधीक्षक शैलेश चव्हाण यांनी मयूर ढसाळ याचे अभिनंदन केले आहे. मयूर ढसाळ याला डॉ सत्यजीत पगारे, प्राध्यापक सागर मगरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.