
लाईफलाइन-मासिआ औद्योगिक क्रिकेट ः हरमीतसिंग रागी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाइन-मासिआ औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत डीबीए संघाने शहर पोलिस ब संघाचा अटीतटीच्या सामन्यात १३ धावांनी रोमांचक विजय मिळवला. या लढतीत हरमीतसिंग रागी याने सामनावीर किताब संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा रंगत आहे. डीबीए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात सात बाद १३९ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना शहर पोलिस ब संघ २० षटकात आठ बाद १२६ धावा काढू शकला. रोमांचक सामना डीबीए संघाने १६ धावांनी जिंकला.
या सामन्यात सूरज एम याने ४१ चेंडूत ५२ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. सूरजने एक षटकार व सात चौकार मारले. सलमान अहमद याने २८ चेंडूत ३४ धावांची वेगवान खेळी केली. त्याने एक षटकार व तीन चौकार मारले. आसिफ खान याने १९ चेंडूत २४ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत हरमीतसिंग रागी याने २१ धावांत तीन विकेट घेत सामना गाजवला. आसिफ शेख याने १४ धावांत दोन गडी बाद केले. देवानंद नाडेकर याने १६ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः डीबीए ः २० षटकात सात बाद १३९ (मुकुल जाजू ६, सूरज एम ५२, रिझवान अझीझ शेख ७, मोहित घाणेकर १२, संजय डोंगरे २०, हरमीतसिंग रागी नाबाद १६, इतर २१, आसिफ शेख २-१४, जीवन बावस्कर २-१९, सलमान अहमद १-२७, मोहम्मद अमन १-७) विजयी विरुद्ध शहर पोलिस ब संघ ः २० षटकात आठ बाद १२६ (आसिफ खान २४, सलमान अहमद ३४, मोहम्मद अमन १८, विजय पांडुरे २२, इतर १५, हरमीतसिंग रागी ३-२१, देवानंद नाडेकर २-१६, दिनकर काळे २-२६, अजय शितोळे १-१४). सामनावीर ः हरमीतसिंग रागी.