
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग, विज्ञान संस्था नागपूर, फॉरेन्सिक सायन्स, तसेच ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली.
या परिषदेत देशभरातून विविध राज्यांमधून २८१ रिसर्च स्कॉलर्स संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. ही परिषद ऑनलाइन मार्फतही संपूर्ण भारतात दिसत होती. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून आयर्नमॅन अमित समर्थ उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विज्ञान संस्था नागपूरचे संचालक डॉ जयराम खोब्रागडे हे उपस्थित होते. या प्रसंगी फॉरेन्सिक सायन्स संचालक डॉ अंजली रहाटगावकर, ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डॉ विजय दातारकर, डॉ सिंकू कुमार सिंग हे की नोट स्पीकर म्हणून तर पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग समन्वयक व विभाग प्रमुख विज्ञान संस्था नागपूर डॉ माधवी मार्डीकर, डॉ सुनील पाटील, डॉ राजू राऊत व डॉ हरिप्रसाद पाईकराव मंचावर उपस्थित होते. या परिषदेचे प्रास्ताविक डॉ माधवी मार्डीकर यांनी केले. डॉ सुनील पाटील यांनी आभार मानले.
प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांनी सांगितले की, फॉरेन्सिक आणि खेळ या दोन्ही गोष्टींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे व या दोघांशिवाय किंवा सायन्स, स्पोर्ट्स आणि फॉरेन्सिक या तिघांची सांगड घातल्याशिवाय खेळामध्ये सुधारणा होऊ शकत नाही.
आयर्नमॅन अमित समर्थ यांनी सायकलिंगचे महत्व, फिटनेसचे महत्त्व, वॉकिंगचे महत्व समजावून सांगितले. डॉ सिंकू कुमार सिंग यांनी आपले ब्लड प्रेशर, शुगर कशाप्रकारे आपण कंट्रोल करू शकतो, वॉकिंग कशा प्रकारे करायचे, चालणे, खेळणे आणि व्यायाम कोणत्या प्रकारे आणि किती दिवस करायचा तसेच हार्ट अटॅक न येण्यासाठी कोणते व्यायाम करायचे, हार्ट अटॅक येऊन गेल्यावर कोणते व्यायाम करायचे इत्यादीची इत्यंभूत माहिती दिली.
डॉ विनय पवार (शिरपूर) यांनी स्ट्रेस मॅनेजमेंटवर तर डॉ कैलास वासेवार यांनी प्लेगेरीझम व रिसर्च पेपर कसा लिहावा यावर अत्यंत सुंदर सोप्या शब्दात माहिती दिली. डॉ संजय ढोबळे यांनी पेटंट व अॅडव्हान्स फिजिक्स भौतिकशास्त्र याबाबत माहिती दिली. एकूण दहा विद्यार्थ्यांना बेस्ट पेपर व बेस्ट ओरल प्रेझेंटेशनचे बक्षीस मिळाले.
१० विविध विषयांचे जज या ठिकाणी उपस्थित होते. समारोप भाषणामध्ये डॉ दीप्ती अंधारमुळे यांनी फॉरेन्सिक सायन्स व सायबर याचे महत्त्व व खेळात फॉरेन्सिक याचे महत्त्व समजून सांगितले. डॉ विशाखा जोशी यावेळेस उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ प्रीती सिंग व डॉ अर्चना महाकाळकर यांनी केले. डॉ राजू राऊत यांनी आभार मानले. डॉ विजय दातारकर, डॉ अंजली रहाटगावकर यांची भाषणे यावेळी झाली. विज्ञान संस्था पीजीटीडी फॉरेन्सिक व ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन येथील सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी यांच्या अथक मेहनतीने ही परिषद अतिशय उत्कृष्टरित्या संपन्न झाली.