
नागपूर : श्री संताजी शिक्षण विकास संस्था द्वारा संचालित संताजी महाविद्यालयातील रोहित सोयाम याची निवड राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे. रोहित हा ऑल इंडिया बेस्ट फिजिक ७५ किलो वजन गटात सहभागी होईल. ही स्पर्धा श्री शंकराचार्य विद्यापीठ अर्नाकुलम येथे होणार आहे. रोहित याला क्रीडा विभाग प्रमुख डॉ संजय खळतकर यांचे सहकार्य तर संताजी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रिया वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.