
चार पुरस्कार दिले जाणार ः पल्लवी धात्रक
नागपूर ः नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे २०२३-२४ या वर्षीचे जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी आपले प्रस्ताव विहीत नमुन्यात क्रीडा कार्यालयात सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामाचे व योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे २०२३-२४ या वर्षासाठी नागपूर जिल्ह्यातून गुणवंत क्रीडापटू (पुरुष महिला, दिव्यांग) तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शकांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी मागवण्यात येत आहेत.
या पुरस्कार अंतर्गत नागपूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त चार पुरस्कार देण्यात येतील. तसेच शासन निर्णयामध्ये नमुद आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी ओझालेल्या खेळाडूंना ज्यादाचा पुरस्कार दिला जाईल. यात गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व १० हजार रुपये रोख असे आहे.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱया नागपूर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू यांनी या पुरस्काराचा विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी अनिल बोरवार (९४२२१५९०८३) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे आपला परिपूर्ण अर्ज ३१ मार्चपर्यंत सादर करावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.