
प्रभाकर मांडे प्रतिष्ठानतर्फे आयोजन, जय कोने उपविजेता
छत्रपती संभाजीनगर ः प्रभाकर पांडे प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय सपाटे मारणे (दंड बैठक) स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रांजल सतीष बरेटिये याने २२१० सपाटे मारुन प्रथम क्रमांकाचे २१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेत जय मधुकर कोने याने २२०८ सपाटे मारत ११ हजारांचे द्वितीय तर अर्जुन बनसोडे याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत राज्यभरातून शेकडो खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे उदघाटन व बक्षिस वितरण इतर मागास बहुजन कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड आशुतोष डंख, सचिव प्रमोद झाल्टे, विनायक पांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नंदकुमार पेरे, संजय फतेलष्कर यांनी मुदगल फिरवून स्पर्धेची सुरूवात केली. स्पर्धेत ५ ते १०, ११ ते १४ आणि १८ ते त्यापुढील वयोगटातील राज्यभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी प्रा. हसंराज डोंगरे, प्रा. फुलचंद सलामपूरे, शरद कचरे, ज्ञानेश्वर जाधव, मोहन नंदवंशी, सतीश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धा निरीक्षक प्रा मंगेश डोंगरे, सोमनाथ बकले, हरिदास म्हस्के, अविनाश पवार, अर्जुन बरेटिये, अर्जुन औताडे, अशोक गायकवाड, संदेश डोंगरे, सुदेश डोंगरे, बाबासाहेब थोरात यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी प्रा धर्मेशील घारे, रवींद्र माहूरकर, अॅड गोपाळ पांडे, सुरेश पवार, परमेश्वर जैस्वाल, संतोष गुजराथी, दीपक कनिसे, विलास संभाहरे, प्रदीप सोनी, संकर्षण जोशी, मकरंद जोशी, मोहन मेघावाले, नारायण कानकाटे आदी उपस्थित होते.