
लाईफलाइन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट ः अविष्कार नन्नावरे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाइन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत गुड इयर संघाने कॉस्मो फिल्म्स संघावर सहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या लढतीत अविष्कार नन्नावरे याने सामनावीर किताब संपादन केला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. कॉस्मो फिल्म्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, कॉस्मो फिल्म्स संघ १८.४ षटकात १११ असे माफक लक्ष्य उभे करुन सर्वबाद झाला. गुड इयर संघाने १६ षटकात चार बाद ११२ धावा फटकावत सहा विकेटने मोठा विजय संपादन केला.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात अविष्कार नन्नावरे याने २० चेंडूत ३६ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने तीन उत्तुंग षटकार व एक चौकार मारला. विराज चितळे याने २४ चेंडूत २३ धावा फटकावल्या. विराजने तीन चौकार मारले. सुनील जाधव याने चार चौकारांसह २३ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत अविष्कार नन्नावरे याने प्रभावी कामगिरी नोंदवत २७ धावांत तीन विकेट घेत सामना गाजवला. सागर दुबे याने २२ धावांत दोन गडी बाद केले. विराज चितळे याने १२ धावांत एक गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी बजावली.
संक्षिप्त धावफलक ः कॉस्मो फिल्म्स ः १८.४ षटकात सर्वबाद १११ (सतीश भुंजेग २१, विराज चितळे २३, समर्थ जीवरग ९, सागर दाभाडे ७, रामाशिष ११, संभाजी साबळे १०, इतर ३०, अविष्कार नन्नावरे ३-२७, सागर दुबे २-२२, ऋषिकेश तरडे १-१३, जितेंद्र निकम १-१७) पराभूत विरुद्ध गुड इयर ः १६ षटकात चार बाद ११२ (ऋषिकेश तरडे २२, सुनील जाधव २३, अविष्कार नन्नावरे नाबाद ३६, अर्जुन राजा नाबाद ४, इतर २५, समर्थ जीवरग १-२१, विराज चितळे १-१२). सामनावीर ः अविष्कार नन्नावरे.