नवी दिल्ली येथे आशियाई योगासन चॅम्पियनशिप

  • By admin
  • March 4, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

२९ ते ३१ मार्च दरम्यान आयोजन

नवी दिल्ली : भारत दुसऱ्या आशियाई योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करणार असून ही चॅम्पियनशिप २९ ते ३१ मार्च दरम्यान इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे. आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धेत एकूण १६ देश सहभागी होणार आहेत.

क्रीडा मंत्रालय आणि योगासन भारत यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या चॅम्पियनशिपचे उद्दिष्ट योगासनाचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व स्वीकारणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे प्रदर्शन करणे आहे.

आशियाई ऑलिम्पिक परिषद, विश्व योगासन, आशियाई योगासन आणि योगासन इंद्रप्रस्थ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम ऑलिम्पिकमध्ये योगासनाचा समावेश करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यास मदत करेल. क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी येथे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘योगाचे जन्मस्थान असलेल्या भारताला दुसऱ्या आशियाई योगासन स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. हा कार्यक्रम फक्त एक स्पर्धा नाही. हे आपल्या प्राचीन ज्ञानाचे आधुनिक स्पर्धात्मक खेळात रूपांतर होण्याचा उत्सव आहे.’

मांडवीय म्हणाले की, ‘आम्ही योगाला जागतिक खेळ बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. ही स्पर्धा त्या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या कार्यक्रमाद्वारे आपण खेळांच्या संदर्भात योगाची उपयुक्तता समजून घेऊ शकू. योगासनामध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जीवन बदलण्याची शक्ती आहे.’

या चॅम्पियनशिपच्या परिणामांवर भर देताना आशियाई योगासनाचे अध्यक्ष संजय मालपाणी म्हणाले की, ‘योगासनाला जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त खेळ म्हणून स्थापित करण्याच्या आमच्या ध्येयातील योगासन चॅम्पियनशिप हा एक निर्णायक क्षण आहे. ‘आम्हाला परंपरेचे आणि आधुनिक क्रीडा उत्कृष्टतेचे मिश्रण हवे आहे.’

विश्व योगासनाचे सरचिटणीस जयदीप आर्य म्हणाले की, ‘ही स्पर्धा आशियातील अपवादात्मक खेळाडूंना एकत्र आणून या प्राचीन पद्धतीची ताकद, लवचिकता आणि शिस्त प्रदर्शित करेल.’ योगासन भारतचे अध्यक्ष उदित शेठ म्हणाले की, ‘भारत या प्राचीन खेळाचे भविष्य घडविण्यासाठी वचनबद्ध आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *