
सलमान अली आघा टी २० संघाचा कर्णधार
लाहोर ः न्यूझीलंड संघाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी मंगळवारी जाहीर झालेल्या पाकिस्तान संघातून कर्णधार मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. रिझवानच्या जागी सलमान अली आघा टी २० संघाचा कर्णधार झाला, तर अष्टपैलू शादाब खान संघात परतला असून शादाबला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
तथापि, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतरही रिझवानला एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. निवडकर्त्यांनी एकदिवसीय संघात फारसे बदल केलेले नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अपयशी ठरलेल्या खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे. बाबरला देखील एकदिवसीय संघात कायम ठेवण्यात आले आहे, परंतु फलंदाज सौद शकील आणि कामरान गुलाम यांना वगळण्यात आले आहे.
शाहीन आणि हरिसही एकदिवसीय संघाबाहेर
निवडकर्त्यांनी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनाही एकदिवसीय संघातून वगळले आहे. पाकिस्तान १६ मार्चपासून न्यूझीलंडमध्ये पाच टी २० आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
पाकिस्तान अजूनही त्यांचा सलामीवीर सॅम अयुब शिवाय खेळेल, जो अद्याप घोट्याच्या दुखापतीतून बरा झालेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे सलामीवीर फखर झमानला दौऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी खूप खराब होती. २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या पाकिस्तानला अवघ्या नऊ दिवसांत स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या पराभवानंतर संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. बांगलादेश संघाविरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला. पाकिस्तान संघाला एकही सामना जिंकता आला नाही.
पाकिस्तानचा एकदिवसीय संघ : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आघा (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, आकिफ जावेद, बाबर आझम, फहीम अश्रफ, इमाम उल हक, खुशदील शाह, मोहम्मद अली, मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह सुफियान मुकीम, तैयब ताहिर.
पाकिस्तानचा टी २० संघ : सलमान अली आगा (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल समद, अब्रार अहमद, हरिस रौफ, हसन नवाज, जहांदाद खान, खुशदील शाह, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद हरिस, मोहम्मद.