
लाईफलाइन-मस्सिया औद्योगिक क्रिकेट ः स्वप्नील चव्हाण सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाइन-मस्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत प्रकाशझोतात झालेल्या सामन्यात महावितरण संघाने फार्मा स्ट्रायकर्स संघावर सात गडी राखून मोठा विजय संपादन केला. या लढतीत स्वप्नील चव्हाण याने अष्टपैलू कामगिरी नोंदवत सामनावीर किताब मिळवला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. फार्मा स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात नऊ बाद ११८ असे माफक लक्ष्य उभे केले. महावितरण संघाने १३.१ षटकात तीन बाद ११९ धावा फटकावत सात विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात स्वप्नील चव्हाणची ५१ चेंडूतील नाबाद ८४ धावांची खेळी धमाकेदार ठरली. त्याने दोन षटकार व बारा चौकार मारले. विवेक घुले (३२), सतीश काळुंके (३१) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत राम राठोड (२-१२), कैलास शेळके (२-१६) आणि स्वप्नील चव्हाण (२-१९) यांनी प्रत्येकी दोन गडी टिपत चमकदार कामगिरी नोंदवली.
संक्षिप्त धावफलक ः फार्मा स्ट्रायकर्स ः २० षटकात नऊ बाद ११८ (संतोष जमधाडे १०, साई डहाळे ६, विवेक घुले ३२, सतीश काळुंके ३१, साहू ६, शिवाजी झिंजुर्डे नाबाद ११, मुरली शिंदे नाबाद २, इतर ११, कैलास शेळके २-१६, राम राठोड २-१२, स्वप्नील चव्हाण २-१९, शशी सपकाळ २-२७, पांडुरंग धांडे १-२१) पराभूत विरुद्ध महावितरण संघ : १३.१ षटकात तीन बाद ११९ (स्वप्नील चव्हाण नाबाद ८४, राहुल शर्मा १९, राम राठोड ७, प्रदीप चव्हाण नाबाद ३, साई डहाळे २-२८, सतीश काळुंके १-२१). सामनावीर : स्वप्नील चव्हाण.