
देशभरातील नामांकित संघ व गोल्फ खेळाडूंचा मोठा सहभाग
पुणे : एप्रिल महिन्यात पुण्यात होणाऱ्या अतिशय नावाजलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज देशभरातील विविध संघ सहभागी होऊन पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब येथे भव्य अशा ऑक्सफर्ड गोल्फ लीगची घोषणा करण्यात आली. त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफोर्ड गोल्फ लीग मध्ये पुणेकराना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यात या आंतरराष्ट्रीय लीगच्या सामन्यासाठी खेळाडूंच्या संघाची नोंदणी करण्यात आली. सर्व यजमान संघाचा यावेळी स्वागत समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन गोल्फ इंडस्ट्री आसोसिएशनचे अध्यक्ष व ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सचे संचालक अनिरुद्ध सेवलेकर व रोहन सेवलेकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी प्रत्येक संघांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. ध्वज देऊन व केक यावेळी फिक्कीच्या माजी अध्यक्षा नीलम सेवलेकर, एस गोल्फिंगचे आदित्य मालपाणी यांसह खेळाडू आणि संघ प्रायोजक उपस्थित होते.
या लीगमध्ये तब्बल बारापेक्षा जास्त संघ सहभागी झाले आहेत. आजपर्यंत ईगल फोर्सेस, बिनधास्त बॉईज, सुलतान स्विंग्स, ब्लिस्ट्रिंग बर्ड्स, झिंगर्स, ग्रीन गॅडीटर्स, सुझलोन ग्रीन्स, रोरिंग टायगर्स, पुना लायन्स, सुब्बन सनरायजर्स, द लीगशी क्लब, बर्डी स्कॉड यासारखे मातब्बर संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफर्ड गोल्फ लीग स्पर्धा अतिशय चुरशीची आणि रंगतदार होणार असल्याचे आयोजक रोहन सेवलेकर यांनी सांगितले आहे.