
बजाजनगर स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे आंतरशालेय सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतर शालेय सूर्यनमस्कार स्पर्धेत लिटल एंजल्स स्कूल, भोंडवे पाटील पब्लिक स्कूल, राजा शिवाजी विद्यालय या शाळांच्या संघांनी विजेतेपद पटकावले.
बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आंतरशालेय सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन बजाजनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर बजाजनगर या ठिकाणी करण्यात आले होते. ही स्पर्धा वैयक्तिक व सांघिक गटात घेण्यात आली. बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने प्रथमच विविध स्पर्धेचे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनचे हे दुसरे वर्ष असून या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक हनुमान भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते कैलास भोकरे, अॅड योगेश ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते उमेश दुधाट, कामगार कल्याण मंडळ निरीक्षक दिनकर पाटील, स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक नितीन देशमुख, लिटल एंजल स्कूलच्या प्राचार्या स्वाती पाटकरी, रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या अपार यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत वाळूज पंचक्रोशीतील विविध शाळा, महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत २१ संघांतून एकूण ६७६ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. पंच म्हणून सतीश काळे, कमल धोत्रे, अलका नलावडे यांनी काम पाहिले.
सर्व गटातील खेळाडूंना प्रमाणपत्र, मेडल, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा कैलास जाधव, सचिव शेख शफी, कोषाध्यक्ष सी के जाधव, रामेश्वर वैद्य, कार्याध्यक्ष समाधान हराळ, बीएसएफ संचालक अमोल मुंगीकर, दीपमाला राजपूत व बीएसएफचे सर्व संचालक मंडळ व क्रीडा शिक्षक यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कैलास जाधव यांनी केले. शेख शफी यांनी आभार मानले.
सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धा
पहिली ते चौथी गट मुले ः १. लिटल एंजल्स स्कूल, २. भोंडवे पाटील पब्लिक स्कूल, ३. रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल.
वयोगट पहिली ते चौथी मुली ः १. भोंडवे पाटील पब्लिक स्कूल, २. लिटल एंजल्स स्कूल, ३. भगवान महावीर स्कूल.
पाचवी ते नववी वयोगट मुले ः १. राजा शिवाजी विद्यालय, २. भोंडवे पाटील पब्लिक स्कूल, ३. लिटल एंजल्स स्कूल.
पाचवी ते नववी वयोगट मुली ः १. लिटल एंजल्स स्कूल, २. राजा शिवाजी विद्यालय, ३. भोंडवे पाटील पब्लिक स्कूल.
वैयक्तिक सूर्यनमस्कार स्पर्धा
पहिली ते चौथी गट मुली ः १. गौरी गिराम (लिटल एंजल्स स्कूल), २. ईश्वरी वाळके (भगवान महावीर स्कूल), ३. अश्विनी कदम (भोंडवे पाटील पब्लिक स्कूल), ४. सृष्टी फुलभाटी (भगवान महावीर स्कूल).
पहिली ते चौथी गट मुले ः १. स्वयंम कोल्हे (लिटल एंजल स्कूल), २. अभिजय गिराम (लिटल एंजल स्कूल), ३. ईशान मैड (भोंडवे पाटील पब्लिक स्कूल), ४. दिव्यम कोल्हे (लिटल एंजल स्कूल).
पाचवी ते सातवी गट मुली ः १. कृष्णाली साळुंके (राजा शिवाजी विद्यालय), २. भाविका ढमढेरे (लिटल एंजल्स स्कूल), ३. नंदिनी आडे (राजा शिवाजी विद्यालय), ४. वेदिका डिघोले (राजा शिवाजी विद्यालय).
पाचवी ते सातवी गट मुले ः १. मयंक हुले (भोंडवे पाटील पब्लिक स्कूल), २. पार्थ कुलकर्णी (लिटल एंजल स्कूल), ३. दिव्यांश बोरकर (भोंडवे पाटील पब्लिक स्कूल), ४. वैभव बराटे (राजा शिवाजी विद्यालय).
आठवी ते नववी गट मुले ः १. पियुष भोसले (राजा शिवाजी विद्यालय), २. वैभव कावळे (राजा शिवाजी विद्यालय), ३. शिवतेज कुबदे (राजा शिवाजी विद्यालय), ४. होम वाटोळे (छत्रपती संभाजी राजे स्कूल), ५. सार्थक वाघ (राजा शिवाजी विद्यालय).
आठवी ते नववी गट मुली ः १. दर्शनी राज कोरडे (राजा शिवाजी विद्यालय), २. समीक्षा सोनवणे (राजा शिवाजी विद्यालय), ३. हर्षदा मोरे (राजा शिवाजी विद्यालय), ४. हर्षदा पाटील (राजा शिवाजी विद्यालय).