
श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलतर्फे विज्ञान प्रदर्शन व मराठी राजभाषा दिन उत्साहात
छत्रपती संभाजीनगर ः गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व मराठी राजभाषा गौरव दिन निमित्त विविध विषयांवर भित्तीपत्रक बनवणे अशा स्पर्धेचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले होते.
शाळेचे अध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ, मुक्तानंद महाविद्यालयातील प्राध्यापिका करडे तसेच शाळेचे सचिव प्रमोद महाजन यांच्या हस्ते थोर वैज्ञानिक सी व्ही रमण व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच वैज्ञानिकवृत्ती व कल्पकता गरजेचे असून यासाठी आयोजित या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन, सौरमंडल, पवनचक्की, सेंद्रिय युक्त शेती, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, मानवी हृदय, सोलार कुकर, मानवी अवयव अशा विविध विषयांवर प्रदर्शन मांडले होते.
यामध्ये मराठी विषयाच्या भितीपत्रकांचा देखील समावेश होता. पालकांनी देखील या प्रदर्शनामध्ये मोठा सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची तंतोतंत उत्तरे दिली. त्याबद्दल पालकांनी व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे सचिव प्रमोद महाजन, शिक्षिका भाग्यश्री नरोडे वंदना कैतके, सोनाली लबडे, वंदना चव्हाण, शितल नरोडे, पूजा राजपूत, दीक्षा कुंडारे, मनीषा वाघ, कोमल काकडे, सुप्रिया साबणे, रश्मी राजपूत, वैशाली साबणे, दीपिका वाघचौरे, ऋत्विक नरवडे, नारायण राजपूत, विकी कहाटे, गजानन राऊत, जोयेब पिंजारी आदींनी परिश्रम घेतले.