छत्रपती संभाजीनगर ः राज्यस्तरीय सीनियर पुरुष व महिला हँडबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा हँडबॉल संघ निवडण्यासाठी ९ मार्च रोजी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
चाळीसगाव येथे पुरुष गटाची तर नाशिक येथे महिला गटाची सीनियर राज्य हँडबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी ९ मार्च रोजी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय, रामलीला मैदान, सिडको एन ७ या ठिकाणी दुपारी चार वाजता निवड चाचणी घेतली जाणार आहे.
या निवड चाचणीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष डॉ संजय मोरे, सचिव प्रा एकनाथ साळुंके यांनी केले आहे. या निवड चाचणीसाठी निवड समिती सदस्य म्हणून डी आर खैरनार, आशिष कान्हेड, सागर तांबे, अभिजीत साळुंके हे काम पाहतील. निवड चाचणी सुरळीत पार पडावी यासाठी गणपत पवार, सागर तांबे, रेखा साळुंके, अभिजीत साळुंके, बाजीराव भुतेकर, सुयश नाटकर, रुपाली शेळके, पांडुरंग कदम, यशवंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.