
धाराशिव ः सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेले गणेश पवार यांची तुळजापूर तालुका क्रीडा अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
गणेश पवार यांना नुकतीच पदोन्नती मिळाली आहे. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गणेश पवार यांनी पदभार स्वीकारला. यावेळी धाराशिव जिल्ह्यात त्यांचे स्वागत ज्येष्ठ क्रीडा शिक्षक व कबड्डी जिल्हा संघटनेचे अमर राऊत, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे सहसचिव योगेश थोरबोले, राज राठोड, राज्य पुरस्कार प्राप्त कुलदीप सावंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी फुटबॉल संघटनेचे सचिव जावेद शेख, मॉडर्न पेंटॅथलॉन जिल्हा संघटनेचे माऊली भुतेकर, ॲथलेटिक्स प्रशिक्षक अजिंक्य वराळे, वरिष्ठ लिपिक वालवडकर, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, आर्चरी प्रशिक्षक शुभांगी रोकडे, राहुल जाधव, जानव्ही पेठे, सुरेश कळमकर, किशोर भोकरे आदी उपस्थित होते.