
छत्रपती संभाजीनगर ः टीआरएस फाऊंडेशएनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी हाय टच बुटिक महिला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात येत असून पाटोदा परीसरातील चेसलँड चित्रकूट व्हॅली या ठिकाणी ही स्पर्धा शनिवारी सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी रोख ११ हजार रुपयांची पारितोषिके हाय टच बुटिकच्या संचालिका सारिका गोयंका यांनी प्रायोजित केली आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात महिलांचा बुद्धिबळ क्षेत्रात विकास व्हावा असे मत सारिका गोयंका यांनी व्यक्त केले आहे.
या स्पर्धेत प्रथम ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार रुपये, तृतीय १८०० रुपये, चतुर्थ १ हजार रुपये, पाचवे ६०० रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सहा ते पंधरा क्रमांकापर्यंतच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चेस सेट देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत एकूण २४ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रवेश शुल्क ३०० रुपये ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६३७२७११३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सारिका गोयंका, तेजस्विनी सागर, हेमेंद्र पटेल, अंजली सागर यांनी केले आहे.