
छत्रपती संभाजीनगर ः अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र कप किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या १३ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
दि किक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र व अहिल्यानगर जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर क्रीडा संकुल वाडिया पार्क येथे महाराष्ट्र कप किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी राकाज् हेल्थ क्लब ज्योतीनगर येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघामध्ये १३ खेळाडूंची निवड करण्यात आली.
राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी गौरव रासकर (ऑर्चिड टेक्नो स्कूल), श्रेष्ठ खोराटे (केंद्रीय विद्यालय), विराज कदम (तनवाणी इंग्लिश स्कूल), स्वराज श्रीपती (ऑर्चिड टेक्नो स्कूल), वेदांत टाले (पोतदार इंग्लिश स्कूल), आदित्य यादव (तनवाणी स्कूल), अभिजीत कौशल्य (थर्टी सिक्स मराठा मीडियम रेजिमेंट), धीरज डागर (थर्टी सिक्स मराठा मीडियम रेजिमेंट), दुर्योधन येले (थर्टी सिक्स मराठा मीडियम रेजिमेंट), छोटू राम (थर्टी सिक्स मराठा मीडियम रेजिमेंट), कृष्णा जंगले (जिगिषा इंटरनॅशनल स्कूल), राजरत्न बनकर (एमआयटी हायस्कूल), पायल शिंदे (मुकुल मंदिर स्कूल), प्रांजली ढाकने (राधा कृष्णा विद्यालय) या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
३६ मराठा मीडियम रेजिमेंटचे मेजर निशात जोशी, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर किक बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश मिरकर, सचिव अनिल मिरकर, ३६ मराठा मीडियम रेजिमेंटचे प्रशिक्षक सागर रासकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.