
छत्रपती संभाजीनगर ः ज्ञानदा इंग्लिश स्कूलतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त मुली व महिलांसाठी मोफत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वर्ग पहिली ते चौथी वर्ग, पाचवी ते आठवी व खुला गट अशा तीन विविध गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या पाच विजेत्या खेळाडूंना पारितोषिक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा ज्ञानदा इंग्लिश स्कूल, हर्सूल टी पॉइंट येथे रविवारी (९ मार्च) सकाळी दहा वाजता सुरू होईल. स्पर्धेचे उद्घाटनानंतर लगेच पहिली फेरी सुरू करण्यात येणार आहे. महिलांना तसेच मुलींना प्रोत्साहन मिळावे म्हणून शाळेकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या बुद्धिबळ स्पर्धेत जास्त मुली व महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, शाळेचे संचालक नागेश जोशी, ऋषिकेश जोशी, मनीषा जोशी,अनिता शिधये, मुख्याध्यापिका ममता जैस्वाल यांनी केले आहे.