
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभाग
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पुरुष खो-खो संघ घोषित करण्यात आला आहे. ग्वाल्हेर येथील विक्रांत विद्यापीठाद्वारे आयोजित पुरुष गटाच्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेकरीता नागपूर विद्यापीठाचा संघ सहभागी झाला आहे.
पुरुष खो-खो संघाला विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रभारी संचालक डॉ विशाखा जोशी यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात शुभेच्छा देऊन स्पर्धेकरीता रवाना केले. या प्रसंगी संघ व्यवस्थापक डॉ संजय चौधरी, खो-खो संघ निवड समिती सदस्य प्रा पराग बन्सोले आणि डॉ अमित कंवर उपस्थित होते. निवड झालेल्या संघाला विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यापीठाचा पुरुष संघ
साकेत गायधने (श्री बिंझानी सिटी कॉलेज नागपूर), शंतनू धारगावे (श्री बिंझानी सिटी कॉलेज नागपूर), दीक्षित नेवारे (श्री निकेतन कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर), अमन सरवरे (श्रीनिकेतन कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर), विकास बोडबोले (धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर), अमन केलवडे (श्रीनिकेतन कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर), स्वरूप मोटघरे (श्री बिंझानी सिटी कॉलेज नागपूर), अनिकेत लौडघरे (श्रीनिकेतन कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर), अनिकेत पाटील (एसएसएनजे महाविद्यालय देवळी), चेतन डोनाडकर (धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर), चैतन्य सुरजुसे (अरविंदबाबू देशमुख कॉलेज भारसिंगी), यशवंत सिंगनापुरे (श्री बिंझानी सिटी कॉलेज नागपूर), हर्षल गणेशे (राणी अग्निहोत्री इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर सायन्स वर्धा), हर्षल टिंगासे (यशवंत महाविद्यालय सेलू), मारुती कुडयामी (ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर) यांचा समावेश आहे.