
छत्रपती संभाजीनगर ः जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शनिवारी शाळेत करण्यात आले होते.
या प्रसंगी ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुपदाबाई काळे, मनकरना राऊत, शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा अकबर बेग, शाळेचे डायरेक्टर अजगर बेग, संस्थेच्या संचालिका इश्रत बेग यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
शाळेतील विविध विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले तर महिला सशक्तीकरण, नारी शक्ती, महिला सुरक्षा व आजच्या परिस्थितीत महिलांची प्रत्येक क्षेत्रात घेतलेली भरारी पाहता अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढलेली स्री प्रगतीचे प्रतीक म्हणून भव्य रांगोळी लक्षवेधक ठरली. महिलांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा अकबर बेग, डायरेक्टर अजगर बेग व ईश्रत बेग यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतना पटेल, पूनम पाटील, अश्विनी उगले, वंदना चावरे, निशिगंधा तायडे, स्नेहल पाटील, ज्योती कापसे, शुभांगी बाविस्कर, कविता काटापले, आरती डहाळे, शितल खैरनार, कावेरी खेडकर, ज्योती गायके, गायत्री पवार, सारिका पवार, पूजा कवडे, मयुरी वानखडे, बालिका कांबळे, मीनाक्षी परदेशी व शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा कैलास जाधव व श्याम जाधव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.