
छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटनेतर्फे आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रणरागिणी सायकल राईडमध्ये सहा वर्ष ते साठ वर्ष वयोगटातील तब्बल ६० हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला.
सायकल चालवल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. तसेच सायकल चालविल्यामुळे शरीरातील सर्व स्नायूंचा व्यायाम होतो. सायकल चालवण्यास कोणत्याही वयाचे बंधन नाही. दिवसाच्या २४ तासांमधील अवघी १५ मिनिटे जरी सायकल चालवण्यासाठी दिले तरी त्याचा शरीर आणि मनावर चांगला परिणाम दिसून येतो. मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर हा उत्तम पर्याय आहे. सायकल रॅली सेवेन हिल येथील सायकल बेट पासून सुरू होऊन क्रांती चौक मार्गे अहिल्याबाई होळकर पुतळ्या जवळ समाप्त झाली. सायकल रॅलीचे हे सातवे वर्ष होते.
या सायकल रॅलीमध्ये संघटनेचे सायकलपटू सोनम शर्मा, रिचा जैन, श्रद्धा कचेश्वर, अश्विनी जोशी, अर्णिका कचेश्वर, कृतिका कचेश्वर, वैशाली आघाव, वैशाली जाधव, मनस्विनी काळे, वैशाली लिगदे, निखिल कचेश्वर, चरणजित सिंग संघा, अतुल जोशी, अमोघ जैन, मनीष खंडेलवाल, अनय जैन, अनिल सुलाखे, चंद्रकांत कदम, अंकुश केदार, अमेय कुलकर्णी, संतोष हिरेमठ, मोहन उन्हाळे, विष्णू बैनाडे, शाकीर शेख, सुनील कोंडेवार, जयंत सांगवीकर, हर्षद अदालकोदा, भाऊसाहेब गवळी, रवींद्र जोशी, बालाजी नारागुडे, अजय कुलकर्णी, मुकेश शेडमकर, मधुकर जाधव, मनोज जाधव, अभिजीत गडाख, पवन धोंडी, विकास पाटील, संतोष बेडके, महेश काळे, डॉ महेश जांबुरे, संग्राम वरेकर, आरव गडाख, अंकिता लाहोटी, पराग लीगडे, श्रीनिवास लिगदे यांनी सहभाग नोंदविला.