महिला दिन वॉकथॉनला मोठा प्रतिसाद

  • By admin
  • March 9, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे महिला दिनानिमित्त आयोजन

छत्रपती संभाजीनगर : महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देण्यासाठी सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आयोजित महिला दिन वॉकथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात १०० हून अधिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

वॉकथॉनची सुरुवात कॅनॉट गार्डन येथून झाली आणि एन १ गणपती मंदिर येथे समारोप झाला. विविध वयोगटातील पुरुष आणि महिला या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी महिलांच्या हक्क, आरोग्य आणि सुरक्षेविषयी जनजागृती करण्याचा संदेश दिला.

सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ विजय व्यवहारे यांनी सांगितले की, “महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुरुषांनी महिलांच्या बरोबरीने उभे राहणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमादरम्यान सहभागी सदस्यांनी महिलांच्या सन्मानासाठी घोषवाक्ये दिली आणि जनजागृतीपर फलक हातात घेतले होते. वॉकथॉन निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरात महिला सशक्तीकरणाचा सकारात्मक संदेश पोहोचवण्यात आला.

या उपक्रमात कोषाध्यक्ष डॉ अरुण गावंडे, अश्विनी लहाने, वैशाली वाजपे, प्रणिता बर्दापूरकर, विश्रांती गायकवाड, मनीष जोशी, सचिन जोशी, मानसी कागवटे, लता शिरसाट, पुष्पा सावरकर, शिल्पा भागडे, डॉ चेतना जिंदानी, आनंद तारके, उमेश धावणे, अश्विनी गजभारे, डॉ प्राजक्ता इंगळे, चेतना, अमूल, जसप्रीत, रूपाली, मीनल, शुभांगी, योगिता आदी ८० महिलांनी भाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *