
यवतमाळ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद तसेच महाराष्ट्र राज्य व छत्रपती संभाजीनगर सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६८व्या शालेय राष्ट्रीय १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या सॉफ्टबॉल स्पर्धेत देवांशी पांडे हिने सांघिक सुवर्णपदक संपादन केले.
या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत यवतमाळ येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या देवांशी धीरज पांडे हिची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने छत्तीसगड संघाचा २-१ होम रनने पराभव करुन विजेतेपद पटकावले. या विजयात देवांशी हिचे मोलाचे योगदान राहिले.
या सुवर्ण कामगिरीबद्दल शारीरिक शिक्षक प्रमुख संजय कोल्हे, पंकज शेलोटकर, अभिजीत पवार, महेश गहूकार, हर्षा इंगळे,रोशना घुरडे यांनी तिचे अभिनंदन केले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, शाळेच्या प्राचार्य रीना काळे, उपप्राचार्य जागृती गंडेजा, प्रशासकीय अधिकारी श्रीकांत ठाकरे, यवतमाळ जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ विकास टोने, नरेंद्र तरोने, डॉ संदीप चावक, प्रा नरेंद्र फुसे आदींनी तिचे कौतुक केले आहे.